Dehu : देहूत जागतिक दिव्यांग दिन साजरा

एमपीसी न्यूज : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त देहू नगरपंचायत प्रशासनाच्या(Dehu) वतीने दिव्यांगांचा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

श्री संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, बाळासाहेब डोके, शुभांगी काळोखे, नगरसेविका ज्योती टिळेकर,विलास हगवणे यांच्या हस्ते पुष्पहारार्पण श्री संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.

दिव्यांग दिनानिमित्त उपस्थित दिव्यांगांना पुष्प देऊन स्वागत करण्यात (Dehu)आले . यावेळी विविध त्यांना योजनांचे मार्गदर्शन केले आणि २०१९ च्या सामाजिक न्याय विभागाचे शासन निर्णयाचे वाचन शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी केले.

Pune : प्रोजेक्ट टायगर’ सुवर्ण महोत्सवानिमित्त स्पर्धांचे पारितोषिक वितरण

मुख्याधिकारी घार्गे महिला व बालकल्याण समितीचे सभापती पौर्णिमा परदेशी, नगरसेविका सपना मोरे, राजेंद्र वाकचौरे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर केक कापून उपस्थित दिव्यांगांना शुभेच्छा देण्यात आल्या. अल्पोहाराने स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.