Election Result 2023 : जातीच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा काही लोकांचा प्रयत्न – मोदी

एमपीसी न्यूज -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, छत्तीसगड, (Election Result 2023)मध्य प्रदेश आणि तेलंगणामधील निवडणुकांबद्दल जनतेचे आभार मानताना रविवारी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, हे लोक जातीच्या नावावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या निवडणुकीत समाजाला जातींमध्ये विभागण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले. पण मी सतत म्हणत होतो की माझ्यासाठी देशात फक्त चार जाती सर्वात मोठ्या जाती आहेत. ही आपली स्त्री शक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे आहेत. या चार जातींना सक्षम करूनच देश मजबूत होणार आहे. आज मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि आदिवासी या जातीत मोडतात.

दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आजचा विजय ऐतिहासिक आहे. सबका साथ, सबका विकास या भावनेचा विजय झाला आहे. विकसित भारताची हाक जिंकली आहे. आत्मनिर्भर भारताचा विजय झाला. आज भारताच्या विकासासाठी राज्यांच्या विकासाच्या विचाराचा विजय झाला आहे. आज प्रामाणिकपणाचा विजय झाला आहे.

Pune : प्रोजेक्ट टायगर’ सुवर्ण महोत्सवानिमित्त स्पर्धांचे पारितोषिक वितरण

खरे तर मध्य प्रदेशात भाजपने सत्ता कायम ठेवली आहे, तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्यात आले आहे. याशिवाय तेलंगणात काँग्रेस प्रचंड बहुमताकडे वाटचाल करत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील तरुणांना विकास हवा आहे. ते म्हणाले, निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, देशातील तरुणांना फक्त विकास हवा आहे. ज्या सरकारांनी तरुणांच्या विरोधात काम केले त्यांना सत्तेतून बाद केले आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा ही उदाहरणे आहेत. या तिन्ही राज्यात सत्तेत असलेले पक्ष सरकारबाहेर आहेत.

लोकसभा निवडणूक आणि INDIA वर काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी म्हणाले की काही लोक म्हणत आहेत की या हॅटट्रिकमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची हॅटट्रिक निश्चित झाली आहे. ते पुढे म्हणाले की, हा भ्रष्टाचाराच्या विरोधातील जनतेचा पाठिंबा आहे. हे निवडणूक निकाल काँग्रेस आणि त्यांच्या अहंकारी आघाडीसाठी मोठा धडा आहेत. एका व्यासपीठावर कुटुंबातील काही सदस्यांनी एकत्र येऊन कितीही चांगले फोटो काढले तरी देशाचा विश्वास जिंकता येत नाही, हाच धडा. देशातील जनतेची मने जिंकण्यासाठी राष्ट्रसेवेची तळमळ असायला हवी.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, जेडीयू, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टीसह अनेक पक्षांची विरोधी आघाडी ‘इंडिया’ भाजपविरोधात एकत्र आली आहे.

तेलंगणाबद्दल काय बोलले होते?

मी तेलंगणातील लोक आणि भाजप कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानतो. प्रत्येक निवडणुकीत तेलंगणात भाजपचा आलेख वाढत आहे. मी तेलंगणातील जनतेला आश्वासन देतो की आम्ही तुमच्या सेवेत कोणतीही कसर सोडणार नाही. या निवडणूक निकालाची प्रतिध्वनी दूरपर्यंत जाईल, या निवडणूक निकालांची प्रतिध्वनी जगभर ऐकू येईल. हे निवडणूक निकाल जगभरातील गुंतवणूकदारांना आत्मविश्वास देतात असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.