Pune :’ससून’च्या अधिष्ठात्यांवर कठोर कारवाई करावी

एमपीसी न्यूज – ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेले (Pune)ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचे रुग्णालयातील पायाभूत सुविधांकडेही लक्ष नव्हते. वारंवार लिफ्टमध्ये होणार बिघाड, सामान्य रुग्णांना मिळणारी सेवा, रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास याकडे सतत अधिष्ठात्यांनी दुर्लक्ष केले.

रुग्णांसह नातेवाईक व डॉक्टर्स, नर्स यांच्या जीवाशी ससून रुग्णालयाचे प्रशासन खेळत आहे. या सगळ्या प्रकाराला जबाबदार डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

सुरवसे यांनी आरोग्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन दिले असून,(Pune) लिफ्टच्या संबंधित अधिकाऱ्यांसह डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनात सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, ससून सर्वोपचार रुग्णालयातील लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात 3 नोव्हेंबर रोजी रुग्णालयाच्या चौथ्या ते पाचव्या मजल्यावर लिफ्ट अडकली होती.

 

Dehu : देहूत जागतिक दिव्यांग दिन साजरा

त्यामध्ये सहाजण सुमारे एक तास अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अक्षरशः ही लिफ्ट कापून आतील नागरिकांना बाहेर काढले. श्वास कोंडल्यामुळे या नागरिकांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. तरीही प्रशासनाला जाग आली नाही आणि 18 नोव्हेंबरला रुग्णालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट पुन्हा अडकली. त्यात डॉक्टर आणि नर्ससह तीनजण अडकले होते. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर लिफ्ट पुन्हा सुरू झाली. या अर्ध्या तासाच्या कालवधीत डॉक्टर आणि नर्स यांना लिफ्टमध्ये श्वास घेणे अवघड झाले होते. यावरून हेच सिद्ध होत आहे की, ससून रुग्णालयातील लिफ्टची देखभाल दुरुस्ती वेळेवर व योग्यरित्या होत नसून सर्वसामान्यांच्या जीवाशी प्रशासन खेळत आहे.

लिफ्ट बंद पडण्याच्या दोन्ही घटनांत सुदैवाने कोणाचेही प्राण गेले नाहीत. मात्र, ससून प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसून, अशा प्रकारची घटना पुन्हा घडून कोणाचा तरी जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? या दोन्ही घटनांकडे गांभीर्याने पाहून ससून मधील सर्व लिफ्ट संदर्भात आढावा घेण्यात यावा. गरज असल्यास नवीन लिफ्ट बसवण्यात याव्यात. लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व अधिष्ठात्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी यांच्याकडे केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.