Pune : भरधाव डंपरची कारला धडक, कार चालकाचा मृत्यू तर पत्नी व मुलगी जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ( Pune ) चारचाकीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात चारचाकीतील चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी व मुलगीही गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात पिरंगुट येथील मुठा खिंडीत रविवारी (दि.24) सायंकाळी घडला.

विक्रांत अण्णा निकटे (वय 28 रा. पिरंगूट) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत विक्रांतची पत्नी वैष्णवी व दीड वर्षांची मुलगी या दोघीही जखमी झाल्या आहेत.

Pune : पुढील पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी ‘संस्कृतभाषा’ आत्मसात करा – विनय दुनाखे

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , विक्रांत हा पत्नी व मुलीसह मुठा खोऱ्यातील वांजळे या त्यांच्या सासरवाडीला गेला होता.

सायंकाळी परत पिरंगुटला येताना मुठा खिंडीतील पारधीबुवा या ठिकाणच्या रस्त्यावर समोरून पुण्याच्या दिशेकडून मुठा गावाकडे भरधाव वेगाने डंपर आला होता. या डंपरने विक्रांतच्या चारचाकीला जोरदार ठोकर दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी व दीड वर्षाची मुलगी या अपघातात जखमी झाल्या आहेत. पिरंगूट पोलीस पुढील तपास करीत ( Pune ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.