Pune : पुढील पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी ‘संस्कृतभाषा’ आत्मसात करा – विनय दुनाखे

एमपीसी न्यूज – संस्कृत ही जगातील सर्वात ( Pune )  प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा आहे. संस्कृतभाषेचे ज्ञानभाषा म्हणून असलेले महत्त्व आजही कायम आहे. आयुर्वेद, गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, कृषीशास्त्राचे मूलभूत ज्ञानभंडार संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. जगभरातील अनेक विद्यापीठात संस्कृत ग्रंथ आहेत, याचा अभ्यासदेखील केला जातो. आपल्या पुढील पिढीला संस्कारक्षम करण्यासाठी संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. संस्कृत भाषेचे ज्ञान आपण घेतले पाहिजे, असे आवाहन संस्कृतभारतीचे प्रांतमंत्री विनय दुनाखे यांनी केले.

संस्कृतभारती संस्थेतर्फे आयोजित संस्कृत संमेलन कात्रज येथील माऊली गार्डन येथे पार पाडले. संमेलनाचे उदघाटन माजी नगरसेविका मनीषा कदम यांच्या हस्ते  झाले. त्यावेळी दुनाखे बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यावेळी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृतभारतीचे प्रांतमंत्री विनय दुनाखे, प्रांतध्यक्ष निवृत्त कर्नल सतीश परांजपे, डॉ. रामचंद्र सिधये, संस्कृत भारती कात्रज विभागाच्या संयोजिका मुक्ता मराठे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संस्कृतभारती संस्थेचे ‘शिवकल्याणराजा’ स्मरणकिचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महराजांचे स्वभाषा अर्थात संस्कृत, स्वराज्य पद्धती, महसूलाचे नियम, स्वधर्म या विषयांवर स्मरणिकेत लेख आहेत.प्रारंभी दीपप्रज्वलन व भारत मातेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले. संमेलनची  सुरुवात संस्कृत गीताने झाली.

 दुनाखे म्हणाले, आपण सर्वांनी संस्कृभाषा शिकली पाहिजे. त्याचबरोब प्रचार-प्रसार करण्याठी पुढाकार घेतला पाहिजे. भारतात एक कोटीहून अधिक लोक संस्कृतमध्ये बोलतात. संस्कृत जनभाषा होण्यासाठी आपण सर्वांनी शिकण्यासाठी  प्रयत्न करावा. संस्कृत ही भारतीय प्राचीन भाषा सरळ, सोप्या अशा स्वरूपात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

संस्कृत भाषा संवर्धनासाठी संस्कृतभारती ही संस्था गेल्या 45 वर्षांपासून निरंतर कार्यरत आहे. संस्कृत शिकण्याची इच्छा असणार्‍या प्रौढांसाठी 10 दिवसांचे संस्कृत संभाषण शिबिर, पत्राचारद्वारा संस्कृतशिक्षण योजना, गीतेच्या माध्यमातून संस्कृत व्याकरणाचे शिक्षण तर लहान मुलांसाठी बालकेंद्र, सरला संस्कृत परीक्षा, प्रथमकक्षातः संस्कृतशिक्षणम् असे विविध वर्ग, उपक्रम संस्कृतभारती द्वारा राबविण्यात येतात. याच कार्याचा एक सर्वसमावेशक उपक्रम म्हणजे हे संमेलन आहे.

Pune : पुणे जिल्ह्यात आढळले कोरानाच्या नवीन व्हेरीअंट जेएन.1 चे तीन रुग्ण

पश्‍चिम महाराष्ट्र प्रातांमध्ये 17 जिल्ह्यांमध्ये संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे. चिन्मय मिशन, रामदेव महाराज, ईस्कॉन मंदिर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यासह अनेक संस्थांचा यात समावेश असल्याचे यावेळी दुनाखे यांनी सांगितले.

संत सेवा संघाच्या प्रतिभा घुबे यांचे ’संत साहित्यावरील संस्कृतचा प्रभाव’  या विषयावर व्याख्यान झाले.

त्या म्हणाल्या, जगातील सर्व भाषचे जननी संस्कृत भाषा आहे. ऋषीमुनींनी आयुर्वेदात संशोधन केले. संस्कृत या शास्त्रीय भाषेत त्यांनी संशोधन केले. संत साहित्यावर संस्कृत भाषेचा पगडा होता. संत ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक कामाची सुरुवात संस्कृत भाषेत आपल्या गुरूंची आराधना करुन केली. आपल्या पूर्वजांनी संस्कृत भाषेचे व्यवहार केले आहे. ही भाषा जीवन व्यवहारात आणू, असा संकल्प करू, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. डोळे उघडे करून संस्कृत भाषा आत्मसात करा, असेही यावेळी त्या म्हणाले.

निवृत्त कर्नल सतीश परांजपे यांचे ‘भगवद्गीता आणि आपले जीवन’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, भगवद्गीता आदर्श आणि तत्वचिंतक ग्रंथ आहे. आपल्या अडचणीवर मात कशी करायची यात आदर्श तत्वे सांगण्यात आली आहे. तत्वज्ञानाचा स्तोत्र म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाते. समाज स्वास्थ्य, नीतिमत्ता वाढविण्याठी भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे, असेही यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंयोजिका यामिनी वेलणकर यांनी केले. संस्कृतभारती संस्थेच्या कार्याचा आढावा यावेळी त्यांनी सांगितला. सूत्रसंचालन अमिता जोशी यांनी केले. तर मुक्ता मराठे यांनी आभार मानले.संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा आणि संस्कृत शिकण्याची इच्छा असणार्‍या सर्व वयोगटातील लोकांना संस्कृतविषयक विविध वर्गांची, शिबिरांची, उपक्रमांची माहिती संमेलनात देण्यात आली.

त्याचबरोबर अनेक संस्कृत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, संस्कृतविषयक व्याख्याने, संस्कृतमधून संभाषण, गीतगायन, प्रदर्शनी, भाषा क्रीडा, इत्यादी विविध कार्यक्रम पार पडली. संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच संस्कृतविषयक पुस्तक विक्री केंद्रला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील कात्रज परिसरात संस्कृतप्रेमींसाठी दिवसभराचे विशेष शिबिर घेण्यात ( Pune ) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.