Pune : बारामती येथील दौरा रद्द करून अजित पवार पुण्यातील निवासस्थानी दाखल

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Pune) हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.तर मराठा आरक्षणाची मागणी मान्य होत नाही.तोपर्यंत राज्यातील अनेक गावांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे.

 

त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटण्यास (Pune) सुरुवात झाली आहे.त्या सर्व घडामोडी दरम्यान बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते होणार होता.मात्र मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पावित्रा लक्षात घेऊन अजित पवार बारामती येथील दौरा रद्द केला.

Pimpri : यशस्वी जीवनासाठी अविरत संघर्ष हाच पर्याय ! प्रा. गणेश शिंदे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर भागातील जिजाऊ निवासस्थानी अजित पवार दाखल झाले आहेत.तर या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.