Pimpri : वायसीएम रुग्णालय जवळ इलेक्ट्रीक दुचाकीने घेतला पेट

एमपीसी न्यूज – येथे इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने पेट घेतला आहे. (Pimpri) सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेले नाही. महानगरपालिकेच्या संत तुकाराम नगर येथील वायसीएम रुग्णालाया जवळ आज (शनिवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

अचानक गाडीने पेट घेतल्याने जवळची वाहने बाजूला करण्यात आली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं.

Pune : पुण्याचे किमान तापमान 12 अंशावर, पुढील चार दिवस थंडीचे

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या जवळ इलेक्ट्रिक मोपेड(Pimpri )दुचाकीने अचानक पेट घेतला. डिक्कीमध्ये लागलेल्या आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केलं. दरम्यान, तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

 

इलेक्ट्रिक मोपेड दुचाकी मध्ये शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही, मात्र गाडीने अचानक पेट घेतल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.