Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा संघटकपदी अक्षय कोठावळे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा संघटकपदी अक्षय संजय कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले.

सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष अक्षय संजय कोठावळे यांनी कोल्हापूर सांगली मधील पूरग्रस्तांना मदत केली. अनाथ व वृद्धाश्रमास मदत केली. तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले आहे. कोठावळे हे पालखीमधील वारकरी बांधवाना अन्नदान व महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे अन्नदान व आरोग्य शिबिर आयोजित करतात. तसेच त्यांचा विविध आंदोलनात सहभाग असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.