Pune News : अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे आढावा बैठक

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे (Pune News) गुरुवारी (दि.19) ब्राह्मण समाजातील अनुभवी, तज्ञ विचारवंत आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

महासंघामार्फत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती देणे आणि पुढील वाटचालीसाठी उपस्थितांकडून मार्गदर्शन घेणे हा या बैठकीचा उद्देश होता. या बैठकीला पुण्यातील विविध क्षेत्रातील ब्राह्मण समाजातील 220 जणं उपस्थित होते.

या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी यांनी महासंघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. महासंघाच्या उद्योजकता विकास विभागाचे अध्यक्ष सत्यजित कुलकर्णी यांनी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे महासंघातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या ‘ब्रह्मोद्योग 2023 ‘ची माहिती दिली.

PCMC News : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूक आचारसंहितेमुळे ‘जनसंवाद’ सभा बंद

सभेला उपस्थित माजी पोलीस महासंचालक प्रवीण जी दीक्षित, सुनंदन जी लेले, सुधीर जी गाडगीळ, दीपक जी शिकारपूर, विवेक इनामदार, महेश जी कुलकर्णी, भावेन जी पाठक, परळकर जी, संदीप जी बेलसरे (अध्यक्ष – स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असो.), अविनाश जी सुभेदार, (आयएएस निवृत्त) निविदिता जी एकबोटे, मंदार जी जोशी (आरपीआयचे राष्ट्रीय संयोजक), यांनी मार्गदर्शन केले.

संघाचे 16 वर्षा चे काम डॉ. गोविंद कुलकर्णी राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांनी सर्वां पुढे मांडले.

गौड ब्राह्मण संघटनेचे सुभाष जी शर्मा, तमिळ ब्राह्मण संघाचे प्रभाकरन जी आणि इतर अनेक मान्यवर सभेला उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले तर सचिन बोधानी यांनी आभार मानले.

पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन टापरे, राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत धडफळे,  सुनील शिरगावकर, कमलेश जोशी, रसिका जोशी, धनंजय जोशी, विकास कुलकर्णी, तेजस फाटक, अमोघ पाठक, विजय शेकदार, वृषाली शेकदार, राहुल जोशी, राहुल साकतकर , तसेच मैथिली जोशी, ऋचा पाठक, जयश्री घाटे, आकांक्षा देशपांडे, शिल्पा महाजनी, वेदिका सदावर्ते यांनी व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.