Pimpri News : माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे रहाटणीतील माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित (Pimpri News) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नखाते यांना नियुक्तीचे पत्र दिले.  

चंद्रकांत नखाते 2002 मध्ये प्रथमच महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवून निवडून आले. 2021 ते 2022 मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA ) सदस्य म्हणून काम केले.

PCMC News : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूक आचारसंहितेमुळे ‘जनसंवाद’ सभा बंद

नखाते यांनी मागील काळात राजकीय व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून जनतेची केलेली जनसेवा, (Pimpri News) कामाचा अनुभव लक्षात घेता. आगामी काळात पक्षाचे संघटन वाढीसाठी अथक परिश्रम कराल असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.