PCMC News : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूक आचारसंहितेमुळे ‘जनसंवाद’ सभा बंद

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा सुरु करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय (PCMC News) होणारी जनसंवाद सभा बंद करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत जनसंवाद सभा होणार नाही. याबाबतचा आदेश महापालिकेचे प्रभारी आयुक्त प्रदिप जांभळे यांनी काढला आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या 15 दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली.

Chinchwad News: कचऱ्यापासून खत निर्मिती, ई वेस्ट आणि पुनर्वापराबाबतच्या प्रदर्शनाला प्रारंभ

27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय होणारी जनसंवाद सभा सव्वा महिना होणार नाही.

नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यापासून म्हणजेच 13 मार्च 2022 पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरु आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांच्या पालिकेसंदर्भातील तक्रारी (PCMC News) सोडविण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी दर सोमवारी जनसंवाद सभा घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा आदेश 14 मार्च 2022 रोजी काढला होता.

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींचा विहित वेळेत निपटारा करण्याकरिता वेळ मिळत नसल्याचे कारण देत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ‘जनसंवाद’ सभेत कपात केली होती.

केवळ प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभा होत होती. आता आचारसंहितेच्या काळात जनसंवाद सभा होणार नाहीत. आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 3 मार्चनंतर जनसंवाद सभा होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.