Pune : पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्ताराला मंजुरी

विस्तारीकरणाआधीचे प्राथमिक टप्प्यावरील काम वेगाने सुरू

एमपीसी न्यूज – प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे रेल्वे स्टेशनचा ( Pune) विस्तार करण्याची गरज आहे. म्हणूनच  प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे. विस्तारीकरणाआधीचे प्राथमिक टप्प्यावरील काम वेगाने सुरू झाले आहे. प्राथमिक टप्प्याचे काम 30 टक्के पूर्ण झाले असून, त्यासाठी 51 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्राथमिक टप्प्यावरील कामामध्ये स्थानकातील फलाट क्रमांक 2,3आणि 6 ची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या फलाटांवर 24 एलएचबी डबे आणि 26 आयसीएफ डब्यांच्या गाड्या थांबू शकणार आहेत. याचबरोबर फलाट क्रमांक 3 चे गाडी जाण्याच्या मुख्य मार्गामध्ये आणि फलाट क्रमांक चारचे गाड्या जाण्याच्या मुख्य मार्गामध्ये रुपांतर केले जाणार आहे. फलाट क्रमांक 1 व 2 च्या मध्ये मालवाहू गाड्यांसाठी दोन वेगळे मार्ग तयार केले जाणार आहेत.

Maharashtra : आजपासून ते 16 ऑक्टोबरपर्यंत सेवा महिना राबविण्यात येणार

पुणे रेल्वे स्टेशनच्या या विस्तारीकरणामध्ये सध्या सिग्नल यंत्रणेचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच रिले रूमसाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली जात आहे. यामध्ये मार्ग क्रमांक 6 आणि 8 चे मुंबईच्या बाजूचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. तिथे लोहमार्गांचे काम सुरू असून, ओव्हरहेड वायरचे कामही लवकरच सुरू होणार आहे.

प्राथमिक टप्प्यावरील काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होईल. त्यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. विस्तारीकरणाचे काम 107 दिवसांत पूर्ण करुन प्रवाशांना लवकरात लवकर सेवेसाठी खुले करुन देण्याचे नियोजन रेल्वेचे ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.