Pune : बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे – आमदार धंगेकर

एमपीसी न्यूज – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Pune) यांच्या विचारांचे बाळकडू राजकारण्यांसाठी गरजेचे असल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या जयंती निमित्त व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या राजकीय व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजाननजी थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, आयोजक अनंत घरत, प्रशांत बधे उपस्थित होते.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी सामान्य माणसाला नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री केले ही त्यांची ताकद आहे आणि मी त्याचे ऐक उदाहरण आहे.  बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू आत्ता राजकारण्यांना तसेच समाजाला गरजेचे आहे.

Pune : बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण – हर्षवर्धन मानकर

या प्रदर्शांनामध्ये तब्बल 150 हून अधिक व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. ही व्यंगचित्रे लवकरच पुस्तकरूपी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तीन दिवासीय असणार्‍या या प्रदर्शनास पहिल्याच दिवशी अनेक व्यंगचित्रकारांनी तसेच सामाजिक व राजकीय मान्यवरांनी या प्रदर्शनास भेट दिली.

आयोजक अनंत घरत म्हणाले की, बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन म्हणजे या महाराष्ट्रातील (Pune) तमाम मराठी माणसाला गलीच्छ राजकारण्यांविषयी आलेला राग असून त्यांच्या व्यक्त झालेल्या भावना आहेत. मशाल पेटवून आजच्या उपक्रमाचे उद्घाटन केले कारण महाराष्ट्रातील प्रदूषित राजकीय अंधार दूर करण्याची वेळ आली आहे.
संजय मोरे म्हणाले की, बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन म्हणजे सामान्य माणसाच्या भावना आहेत. शिवसेना नेहमी सत्याच्या बाजूने लढत असते हे बाळकडू शिवसेनाप्रमुखांची देण आहे.

व्यंगचित्रकार अमित पापळ म्हणाले की, व्यंगचित्र ही बोलकी असावी तळागाळातील व्यक्तीला त्यात आपला अनुभव दिसावा, स्वच्छ राजकारण विकासाची दिशा,  देशातील एकोपा टिकविण्यासाठी पत्रकारांसोबत व्यंगचित्रकार म्हणून आम्ही जबाबदारीने जनजागृती करीत असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.