Pune : बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण – हर्षवर्धन मानकर

एमपीसी न्यूज – बचत गटाच्या माध्यमातून (Pune) महिला सक्षमीकरण करण्यावर भर देणार असल्याचे कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हर्षवर्धन दीपक मानकर यांनी सांगितले.

Alandi : इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चालू असलेल्या उपोषणास विविध संस्था व संघटनेचा पाठींबा

दिवा प्रतिष्ठान मार्फत संक्रांतीच्या शुभपर्वाचे औचित्य साधुन  प्रभागातील विविध परिसरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत महिला बचत गट सुरू करण्यात आले.  प्रभागातील महिलांना एकत्रित करत 50 पेक्षा अधिक बचत गट सुरू करण्यात आले आहेत. महिला भगिनींना संघटित करून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून देणे तसेच  महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दिवा प्रतिष्ठान काम करणार आहे, असेही हर्षवर्धन मानकर म्हणाले. यावेळी नवनाथ खिलारे, कांता खिलारे, सुनिता खरात, मयूर घोडके उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.