Alandi : इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चालू असलेल्या उपोषणास विविध संस्था व संघटनेचा पाठींबा

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी अध्यात्मिक (Alandi) व वारकरी आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने काल दि.15 पासून इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठीचे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. काल इंद्रायणी घाटावर या उपोषणाची सुरुवात केली होती. तर रात्री उशिरा नंतर महाद्वार चौक येथे आंदोलनकर्ते हभप मोहनानंद ओवाळ, हभप मुबारक शेख, फारूक इनामदार, हभप दत्तात्रय साबळे यांचे बेमुदत उपोषण चालू आहे.

Pune: तिळगुळ द्या, पुस्तक भेट घ्या, उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी असणाऱ्या या उपोषणास महाराष्ट्रीय जनशक्ती संघ, संत वाड्:मय सेवा संस्था, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर, आपना वतन संघटना, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शिक्षक सेल) व गोदान पसायदान विश्वजागृती धर्मदाय संस्था यांनी पाठींबा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.