Mulshi : शेतकरी परदेश दौरासाठी राज्य शासनाने निधी वाढवून द्यावा ; मुळशी तालुका शेतकरी संघाची मागणी

एमपीसी न्यूज – राज्यातील शेतकरी परदेशी शैक्षणिक दौरा 2007 साला (Mulshi )पासून बंद होता. कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी शेतकरी सहली पुन्हा सुरू असे आश्वासन देऊन 1 कोटी 40 लाख निधी मंजूर केला आहे. हा निधी कमी निधी वाढवून द्यावा अशी मागणी मुळशी तालुका शेतकरी संघाने केली आहे.  
कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी सांगितले की, शेतकरी सहली पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी दहा कोटी रूपये मंजुर करू , प्रत्यक्षात शासनाने एक कोटी चाळीस लाख मंजूर केले आहेत.

  तसेच या सहलीसाठी वयोमर्यदा 62 ठेवली असून ती 70 वयाची (Mulshi )करावी. त्यासाठी निधी वाढवून देण्याबाबत “मुळशी तालुका शेतकरी संघाने नायब तहसीलदार के. के. थोरात यांना निवेदन दिले.
यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे व उपाध्यक्ष भाऊ केदारी यांनी सांगितले की, शासनाने शेतकर्‍यांचे तोंड पुसण्याचे काम केले आहे. प्रत्येक तालुक्यातील किमान दहा प्रगतीशील शेतकरी जातील एवढा निधी मंजूर करावा. सहलीसाठी करिता मंजूर निधी तुटपुंजा आहे. तसेच परदेशी दौऱ्यासाठी निवड करताना पुढारी व आधिकारी यांच्या जवळची व्यक्ती राहणार.
त्यामुळे प्रत्यक्षात प्रगतीशील शेतकरी जाऊ शकणार नाहीत. त्यामूळे सहलीसाठी शेतकरी निवड प्रक्रिया पारदर्शक करावी अशीही मागणी त्यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.