Mulshi: किरकोळ कारणावरून तरुणाला दोघांकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज –  किरकोळ कारणावरून दोघांनी एका तरुणाला बेदम(Mulshi) मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) माण, मुळशी येथे घडली आहे.
याप्रकरणी शुभम दिनेश बन (वय 24 रा. माण) यांनी हिंजवडी पोलीस (Mulshi)ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून एम एच14 के एच 9515 क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे  दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला तू बाहेरून येवून पुण्यात पोरींचा नाद करतो का म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताने व कमरेच्या बेल्टने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.