Pune : कोयत्याचे वार, 2 तरुण रक्तबंबाळ! पुण्यात भर दिवसा थरार

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्य आणि अनैतिक संबंधाच्या संशावरून दोन (Pune)तरुणांनी एकमेकांवर वार केले. पुण्यात भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात एका तरुणाने दुसऱ्यावर कोयत्याने केले वार केले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे असे दोघे ही (Pune)जणं या घटनेत जखमी झाले असून हे सगळं कृत्य पूर्ववैमनस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून घडल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.

PCMC : ऑनलाइन कर भरण्यास शहरवासीयांची पसंती; 513 कोटी 58 लाख ऑनलाइन कर जमा

मिरेकर आणि धोत्रे हे दोघे ही नातेवाईक आहेत. मिरेकर याला धोत्रे यावर राग होता आणि त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्याने मिरेकर याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर धोत्रे याने सुद्धा त्याच्या साथीदारांना बोलवून मिरेकर याच्यावर हल्ला चढवला आहे.

याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांकडून तपास आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.