PCMC : ऑनलाइन कर भरण्यास शहरवासीयांची पसंती; 513 कोटी 58 लाख ऑनलाइन कर जमा

एमपीसी न्यूज – ऑनलाइनचा जमाना दिवसेंदिवस वाढत असतानाच(PCMC) पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक हायटेक हाेताना दिसून येत आहे. 3 लाख 29 हजार 237 शहरवासीयांनी 513 काेटी 58 लाख रूपयांचा ऑनलाइन कर भरला आहे. तर विविध अँपच्या माध्यमातून 9 हजार 109 नागरिकांनी 9 काेटी 49 लाख रूपयांचा कर महापालिका तिजाेरीत जमा केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय (PCMC)कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 4 लाख 92 हजार 428 मालमत्ता धारकांनी 910 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

 

यापैकी तब्बल 3 लाख 29 हजार 237 शहरवासीयांनी 513 काेटी 58 लाख रूपयांचा ऑनलाइन कर भरला आहे.  91 हजार 411 मालमत्ता धारकांनी 131 कोटी 24 लाखांचा राेखीने भरणा केला आहे. 29 हजार 48 जणांनी धनादेशाद्वारे 147 कोटी 17 लाख, 653 जणांनी आरटीजीएसव्दारे 43 कोटी 20 लाख, 648 जणांनी डीडीच्या माध्यमातून  8 काेटी 12 लाख, 9 हजार 109 जणांनी विविध ॲपच्या माध्यमातून  6 कोटी 93 लाख, 1 हजार 180 जणांनी  इनइफ्टीव्दारे  6 काेटी 83 लाखांचा कर भरणा केला आहे. शहरातील 17 झाेनपैकी वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे 65 हजार मालमत्ता धारकांनी 148 कोटी तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त 8 हजार 96 मालमत्ता धारकांनी 23 कोटी 38 लाखांचा कर भरणा केला आहे.

कर संकलन कार्यालये रात्री नऊपर्यंत सुरू राहणार

कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आज आणि उद्या  सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत नागरिकांना कर भरता यावा, यासाठी कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. तसेच शहरातील निवासी मालमत्ता धारकांकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मात्र, ज्या थकबाकीदारांची आर्थिक क्षमता नाही, त्यांनी टप्या-टप्याने जेवढा शक्य आहे तेवढा कर भरावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले आह

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.