Thergaon: दारु पिऊन  गोंधळ घालताना हटकले म्हणून टोळक्याकडून व्यावसायीकाला मारहाण,सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज –  रोडवर दारु पिऊन धिंगाणा घालत असताना(Thergaon) हॉटेल व्यावसायीकाने हटकले म्हणून आठ ते नऊ जणांनी मिळून व्यावसायीकाला मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) थेरगाव येथे घडली आहे.
याप्रकरणी शाकीर फकीर शेख (वय 40 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस (Thergaon)ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रिक्षा चालक ऋषिकेश राजेंद्र वारभवन (रा. थेरगाव), ओमकार विठ्ठल बोनागिरे, काकासाहेब नानासाहेब पवार, रणजित भिमराव बजबळकर, युवराज विठ्ठल बोनागिरे, साहिल वारभवन यांना अटक केली आहे. इतर तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा रस्त्यात लावून दारु पिऊन गोंधळ घालत असताना फिर्यादीने  त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला.यावरून आरोपी ऋषिकेश याने त्याच्या साथिदारांना बोलावून त्याने फिर्यादी यांना मारहाण करत त्यांच्या हॉटेलमधील खुर्च्यांची तोडफोड केली.यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.