Pune : मल्याळी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी बापट यांनी पुढाकार घ्यावा – बाबू नायर

एमपीसी न्यूज-  महाराष्ट्रीय माणसाचे मन खूप मोठे आहे. म्हणूनच देशाच्या विभिन्न प्रांतातून आलेल्या लोकांना महाराष्ट्राने आपल्यामध्ये सामावून घेतले आहे. मल्याळी बांधवाना महाराष्ट्रात सामावून घेऊन त्यांना या राज्यामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मी आभार मानतो. मात्र मल्याळी समाजासमोर अनेक प्रश्न असून ते सोडविण्यासाठी गिरीश बापट यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक बाबू नायर यांनी केले. मल्याळी बांधवांचा विशू या नववर्ष स्वागताच्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नायर बोलत होते.   
पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र गौरव गिरीश बापट, युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वरदा गौरव बापट, राजीव कुट्टियातुर, बाबू नाम्बियार, मनोज पिल्लई, जयप्रकाश, के आर प्रसाद, मधू मोदीयील आदी उपस्थित होते.
  • बाबू नायर म्हणाले की, मल्याळी बांधवाना महाराष्ट्रात सामावून घेऊन त्यांना या राज्यामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मी आभार मानतो. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक आणि आर्थिक दृष्टीने संपन्न आहे  मल्याळी समाजासमोर अनेक प्रश्न असून ते सोडविण्यासाठी गिरीश बापट यांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.

गौरव बापट यांनी देखील आभार व्यक्त करताना केरळची संस्कृती आणि तेथील सृष्टीसौंदर्य खूप आवडता असल्याचे नमूद केले. तसेच मल्याळी बांधवांच्या समस्या गिरीश बापट यांच्यापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. स्वरदा बापट देखील आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन हरी पिल्लई यांनी केले तर आभार मनोज पिल्ले यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.