Pune : चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकणार

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील चांदणी चौक(Pune) पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्याकडे आले आहे. नवीन पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. हा नवीन पूल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा पुणेकर करत आहेत. या पुलामुळे पुणेकरांना आणखी एक वाहतुकीची चांगली सुविधा मिळणार आहे. सध्या  चांदणी चौक पुलाचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. 1 मे पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही.चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन लांबणीवर पडणार आहे. 

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी होणार होते. परंतु पुलाचे काम पूर्ण न झाल्याने आणखीन दोन महिने उद्घाटनाला लागणार आहे. पुलाचे गर्डर बसवण्याचे काम अपूर्ण असल्याने पूल बांधण्यास आणखीन वेळ लागणार आहे.उड्डाणपुलासाठी टाकण्यात येणाऱ्या गर्डरच्या कामासाठी लागणारी साधनं वेळेत उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे पुलाचे काम आणखी काही दिवस सुरु राहणार आहे. या उड्डाणपुलासाठी खांब उचलण्यात आले असून खांबांवर टाकण्यात येणारे काही गर्डर काँक्रिटीकरणाचं काम बाकी आहे.

Pune : लग्न झाल्याचे लपवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या

चांदणी चौकातील पुलाच्या उद्घघाटनासाठी 1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त ठरला होता. उद्घाटनास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार होता. परंतु सध्या पुलाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. 9  गर्डरच्या माध्यमातून 150 मीटर लांबीचा आणि 32 मीटर रुंदीचा उभारण्यात येतोय. त्य़ाला वेळ लागणार आहे. यामुळे 1 मे चा उद्घाटनाचा मुहूर्त टळणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.