Pimpri : ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा पूर्ववत सुरु होणार

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या पर्यटकांना शहरातील विविध भागांतील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाता यावे; तसेच शहराची संपूर्ण माहिती समजावी, या हेतूने पिंपरी-चिंचवड दर्शनही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला होता. (Pimpri) मात्र या सेवेला पिंपरी-चिंचवडकरांचा प्रतिसाद नं मिळाल्याने ही सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता 1 मे पासून ही सेवा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

पुणे शहरात सुरू असलेल्या ‘पुणे दर्शन’च्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन सेवा सुरू करण्याची पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांची मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे. ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ ही 1 मे पासून दोन वातानुकुलित बससेवा पुर्ववत सुरू होणार असून निगडी भक्ती-शक्ती येथून ही बस सकाळी 9 वाजता सुटणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7.15 वाजेपर्यंत ही सेवा  सुरू राहणार आहे.  त्यासाठी प्रति व्यक्ती 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड दर्शन बसचे तिकीट निगडी, भोसरी व पिंपरी लोखंडे भवन येथील पास केंद्रावर उपल्बध असणार आहे.

Pune : चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकणार

भक्ती-शक्ती उद्यान (रनिंग), इस्कॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चापेकर बंधू स्मारक(रनिंग), सायन्स पार्क, बर्ड व्हॅली, दुर्गा टेकडी, अप्पूघर, देहूगाव (मुख्य मंदिर),  सायन्स पार्क, बर्ड व्हॅली,  मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, प्रतिशिर्डी शिरगाव, देहुगाथा मंदिर या पिंपरी-चिंचवडमधील ऐतिहासिक/ प्रेक्षणिय स्थळांची सफर येथील पर्यटकांना करता येणार आहे.

या सेवेचा लाभ जास्तीत जास्त नागरिक व पर्यटकांनी घ्यावा असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.