Pune :भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाकडून ‘क्रॉनिकल्स ऑफ टाईमलेस ट्रेझर्स’चे सादरीकरण

एमपीसी न्यूज – नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनएफडीसी) अर्थात भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा’अंतर्गत भारतीय चित्रपटांचे राष्ट्रीय संग्रहालय (एनएमआयसी) ‘क्रॉनिकल्स ऑफ टाइमलेस ट्रेझर्स’ या प्रतिष्ठेच्या मालिकेचा भाग म्हणून ‘ज्वेल थीफ’ या गाजलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची(Pune) घोषणा करण्यात आली. दर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता हा चित्रपट रसिकांना एनएमआयसी येथे पुनरुज्जीवित अभिजात सिनेमाच्या वैभवाचा अनुभव घेता येणार आहे.

‘ज्वेल थीफ’ हा विजय आनंद यांचा 1967 मध्ये बनवलेला, अतिशय गाजलेला चित्रपट हा भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वोत्तम रहस्यपटांपैकी एक मानला जातो. पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या समर्पित प्रयत्नांनी अतिशय काळजीपूर्वक हा चित्रपट पुनरुज्जीवित करण्यात आला आहे. ही अभिजात कलाकृती, चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्तेच्या युगात प्रेक्षकांना पुन्हा घेऊन जाते.

बॉलीवूडची अभिनेत्री इशा गुप्ता ही यावेळी प्रमुख पाहुणी होती.  या प्रयत्नांविषयी बोलताना ईशा गुप्ता म्हणाल्या, “एनएफडीसी-एनएमआयसी – एनएफएआयने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे जुन्या पिढीसोबत युवा पिढीला देखील भारतीय चित्रपटाच्या या वैभवशाली वारशाची जाणीव होईल. चित्रपट निर्मितीच्या तंत्रामधील विरोधाभासाबाबत त्यांनी चित्रपट क्षेत्रातील एक म्हणून आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “ वैजयंतीमाला यांची एक चाहती म्हणून, ज्यावेळी मी ‘ज्वेल थीफ’ हा चित्रपट या ठिकाणी पाहिला, त्यावेळी त्यांचे नैसर्गिक सौंदर्य पाहून आणि ज्या प्रकारे पूर्वीच्या काळातील नायिका त्यांचा मनमोहकपणा, अदाकारी सादर करायच्या, ते पाहून मी चकित झाले.”

Indian Navy : भारतीय नौदलाने पूर्व किनारपट्टीवर केला पूर्वी लहर युद्धसराव

या प्रदर्शनासोबत एनएमआयसीने कॅप्चर युवर मुमेंट नावाच्या एका स्पर्धेचे(Pune) आयोजन केले. यामध्ये अभ्यागतांना हे संग्रहालय पाहण्यासाठी आणि संस्थेच्या सहकार्याने रील्स बनवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. विजेत्या प्रवेशिकांची निवड ईशा गुप्ता यांनी स्वतः केली. या संग्रहालयाला भेट देण्याची आणि त्यांच्या आवडत्या अभिजात कलाकृतीच्या पुनरुज्जीवनाचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याबद्दल ईशा गुप्ता यांनी आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.