Pune : शहर शिक्षक लोकशाही आघाडीची सहविचार सभा उत्साहात

एमपीसी न्यूज – पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडीची सहविचार सभा आज एस.एम.जोशी माध्यमिक विद्यालय पुणे येथे पुणे शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आणि पुणे विभाग टीडीएफचे उपाध्यक्ष जी. के. थोरात व राज्य कार्यकारिणी सदस्य प्राचार्य शिवाजीराव कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रसंगी पुणे शहरातील विविध शैक्षणिक प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी विविध शैक्षणिक समस्येबाबत लवकरच शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी ठराव करण्यात आला ,तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खडकवासला विभाग प्रमुखपदी रवींद्र शेंडकर यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

याप्रसंगी पुणे शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे, सचिव संतोष थोरात, पुणे शहरातील आठ विभागातील प्रतिनिधी राज मुजावर, सुनील गिरमे, द्वारकानाथ दहिफळे, संतोष दुर्गाडे, विलास शिंदे, संजय कांबळे, आनंद भिकुले , संजय ढवळे,मुनाफ पांगा आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.