BNR-HDR-TOP-Mobile

Pune: शहरात तापमानाचा पारा 40 वर

एमपीसी न्यूज – सध्या वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे पुणे शहराच्या तापमानाचा पारा (40)चाळीस अंशच्या घरात गेल्याचे आढळले असून पुणे शहराने प्रथमच तापमानात चाळीशी गाठली आहे.

दुपारी तापमान वाढल्याने उन्हाच्या झळांमुळे चटके बसत होते. त्यामुळे नागरिक उन्हाने हैराण झाले आहेत. यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शीतपेयाच्या दुकानावर गर्दी केली होती. तर, काही डोक्यावर टोपी, स्कार्प बांधून वाहन चालवताना आढळत होते.

संध्याकाळी वितरणात बदल होऊन ढगाळ झाल्याने पाऊस पडणार असल्याची स्थिती निर्माण झाली होती. सध्या शहराचे तापमान चाळीसवर गेल्याने आणखी उकाडा वाढणार असल्याचे समजत आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3