Pune Corona News : दुसऱ्या कोरोना लाटेने घेतला तरुणांचा सर्वाधिक बळी

एमपीसीन्यूज : कोरोनाची दुसरी लाट तरुणांसाठी घातक ठरली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये पुणे शहरात दोन महिन्यांत बाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या मृतांमध्ये 129  तरुणांचा समावेश आहे. त्यामध्ये 95 युवक आणि 34 युवती आहेत. सर्वाधिक 40 ते 60  या वयोगटातील 241  जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचेही प्रमाण मागील लाटेपेक्षा जास्त असल्याचे दोन महिन्यांच्या मृतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना, शहरत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र मागील दोन महिन्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाने 129 तरुणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. हे सर्व 20 ते 40  या गटातील आहेत.

_MPC_DIR_MPU_II

तर, दोन महिन्यांत 2 हजार 44  जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीपासून करोनाची दुसरी लाट आली. त्यामध्ये वयाचे सगळे निष्कर्ष गळून पडले आहेत. यावेळी तरुणांना तर बाधा होत आहेच परंतु फुफ्फुसे वेगाने निकामी होऊन जीव जाण्याचे प्रकारही घडत आहेत.

दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू 60  वर्षांवरील बाधितांचे आहेत. दोन महिन्यांत 1 हजार 277  ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 791  पुरुष आणि 486  ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे.

फेब्रुवारीपासून करोनाने पुन्हा थैमान घातले असून, यामध्ये तरुणांना बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागच्या वर्षी तरुण बाधितांची संख्या कमी होती. तसेच. बाधित तरुणांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होते. त्यातही एखाद्या दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याला आधी कोणतीतरी गंभीर व्याधीने ग्रासलेले असायचे आणि त्यातून प्रतिकारशक्‍ती नसल्याने मृत्यू व्हायचा. बाधा झाल्यानंतर लगेचच उपचार सुरू केले नाहीत, उपचारांना पाच – सहा दिवस उशीर झाला तर फुफ्फुसातील संसर्ग वेगाने वाढत जाऊन ऑक्‍सिजनची पातळी खालावून त्यांना कृत्रिम ऑक्‍सिजनवर ठेवण्याचे वेळ आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.