Pune Corona Update : पुणे शहरात नवे 202 रुग्ण ; 336 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आज, सोमवारी दिवसभरात नव्याने 202 रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या दुप्पट होऊ लागली आहे. आज 336 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 19 इतकी आल्यामुळे संसर्ग दर स्थिर आहे. विशेष म्हणजे दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आत्तापर्यंत 1 लाख 72 हजार 280 करोनातून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. एकूण 414 रुग्णांची स्थिती गंभीर असून 253 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

नागरीकांनी निर्धास्त न राहता सातत्याने मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करावे. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या डॉक्टरकडून औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.