Maharashtra Corona Update : 18.55 लाख पैकी 17.30 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 93.28 टक्के

Out of 18.55 lakh 17.30 patients are corona free, recovery rate is 93.28 per cent

एमपीसी न्यूज – राज्यात आज, सोमवारी 3 हजार 075 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 55 हजार 341एवढी झाली आहे. त्यापैकी 17 लाख 30 हजार 715 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 93.28 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आज 7 हजार 345 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे होणा-या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्यात सध्या 75 हजार 767 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील मृतांचा आकडा 47 हजार 774 वर पोहोचला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्यात आज 40 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.57 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 13 लाख 18 हजार 721 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 55 हजार 341 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 5 लाख 55 हजार 180 व्यक्ती होम क्वारंटाइन झाले आहेत. तर 5 हजार 565 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.