Pune Crime : मांडुळाची तस्करी करणार्‍याला भारती विद्यापीठ पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – मांडुळाची तस्करी करणार्‍या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे दोन मांडुळ जातीचे साप आढळले असून तो पंधरा लाख रुपयांना त्याची विक्री करणार असल्याचे तपासात समोर आले आहे.

विकास रामचंद्र फडतरे (वय 28, रा. बोपेगाव, ता. पुरंदर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी मांडुळ जातीच्या सापांची पंधरा लाख रुपयांना विक्री करण्यासाठी कात्रज स्मशानभूमी जवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज स्मशानभूमी परिसरात सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री त्याला अटक केली. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन मांडुळ जातीचे साप जप्त करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.