Pune Crime : जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

एमपीसी न्यूज : पुणे येथील जिल्हा उद्योग केंद्रातील (Pune Crime) निरीक्षकावर लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. याबाबत एका 26 वर्षीय तरुणाने तक्रार केली होती.

या प्रकरणी चंद्रभान गोहाड (वय 57 वर्ष, शिवाजीनगर, पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदाराने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत खेळनिर्मिती उद्योगाकरिता अर्ज केला होता. हा प्रस्ताव बँकेकडे शिफारशी सह पाठविण्याकरिता लोकसेवक चंद्रभान गोहाड यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

Vadgaon Maval : राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिववंदना ग्रुपकडून शालेय साहित्य व खाऊ वाटप

या तक्रारीची पडताळणी 9 जानेवारी रोजी करण्यात आली होती. गोहाड (Pune Crime) यांनी आधी पाचशे रुपये, मग ‘फोन पे’ वरुन हजार रुपये आणि आज दोन हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र. वि. पुणे परीक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव ला. प्र. वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाच लुचपत प्रतिबंध विभागाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.