Alandi : भोगी आणि मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आळंदीतील बाजारात महिलांची गर्दी

एमपीसी न्यूज : 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांत (Alandi) हा सण असल्याने आळंदीमध्ये ठिकठिकाणी सुगडी व शेतातील धान्याच्या वाणाची तात्पुरत्या स्वरूपात दुकाने लागली आहेत. सुगडी व वाण खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारात मोठी गर्दी दिसून येत होती.

बाजारातील रेडिमेड तीळगूळ, तिळाचे लाडू, चिक्की, गुळाची रेवडी, साखरफुटाणे खरेदीला यंदाही प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच, मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असल्याने त्या निमित्ताने सर्व भाज्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी बाजारामध्ये दिसून आली. मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.

Pune Crime : जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये (Alandi) शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ इ.अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.