Vadgaon Maval : राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिववंदना ग्रुपकडून शालेय साहित्य व खाऊ वाटप

एमपीसी न्यूज – राजमाता जिजाऊ भोसले (Vadgaon Maval) यांच्या 425 व्या जयंती निमित्त शिववंदना ग्रुप मावळ यांच्या वतीने शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. खंडोबा मंदिर येथील अंगणवाडीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. शिववंदना ग्रुप मावळचे अध्यक्ष तुषार वहिले यांच्या वतीने शालेय साहित्य वाटण्यात आले. यावेळी अंगणवाडी शिक्षिका अर्चना ढोरे व मदतनीस शुभांगी शिंदे उपस्थित होत्या.

Pune : भारतीय अभिजात कलांमध्ये निपुण परदेशी कलाकारांचे प्रभावी सादरीकरण

ज्यावेळी निजामशाही व आदिलशाही महाराष्ट्रात आपले वर्चस्व गाजवत होती व संपूर्ण महाराष्ट्र गुलामगिरीमधे वावरत होता. दिवसा ढवळ्या स्त्रियांना बाहेर (Vadgaon Maval) सुद्धा पडता येत नव्हते. अशा परिस्थितीत राजमाता जिजामाता यांनी शहाजी राजे यांनी बघितलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आकारास आणले. बाल शिवबाराजेंना पराक्रमाच्या गोष्टी सांगून, मैदानी प्रशिक्षण, घोडेस्वारी, तलवार, भाला चालवायला शिकवले व पुढे मराठी स्वराज्य स्थापिले. जिजाऊ जयंती निमित्ताने खंडोबा मंदिर येथील अंगणवाडीमध्ये जिजाऊ जयंती साजरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.