Pune Crime : कोंढवा पोलिसांनी जेरबंद केला रेकॉर्डवरील चोरटा, दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

0

एमपीसी न्यूज – कोंढवा पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत चोरट्याला सापळा रचून जेरबंद केले. निजाम शेख (वय 23, रा. अशोक नगर कोंढवा बुद्रुक) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. घरफोडीच्या या गुन्ह्याचा तपास सुरू असताना रेकॉर्डवरील सराईत चोरटा निजाम शेख हा कोंढव्यातील मिठानगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले.

त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या 2 घरफोडीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III