Pune Crime : चारित्र्याच्या संशयावरून वीस वर्षीय पत्नीचा खून

एमपीसी न्यूज चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला. पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी हा प्रकार घडला.

पूजा पप्पू चौहान (वय 20) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पती पप्पू उजागर चौहान त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पूजा सोपान वरुडे (वय 34) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पप्पू हा आपल्या पत्नीसह राजगुरूनगर येथे राहत होता. पत्नी रात्री-अपरात्री घराबाहेर जाते तिचे बाहेर काहीतरी लफडे आहे असा संशय आरोपीला होता. यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. शनिवारी ही भांडणे टोकाला गेली आणि त्याने गळा आवळून तिचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.