Pune Crime News : कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून तडीपार

एमपीसीन्यूज : कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

रोशन दयानंद लोखंडे (वय 22, नवदीप सोसायटी, रा. मानाजीनगर, नऱ्हे गाव), असे या गुन्हेगाराचे नाव आहे. मुंबई पोलीस कायदा कलम 56 (1) ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी त्याचा तडीपारीचा आदेश काढला आहे.

रोशन लोखंडे हा सराईत गुन्हेगार आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. कोथरूड परिसरात त्याची दहशत आहे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलीस उपायुक्तांनी त्याच्या तडीपारीचा आदेश काढला.

त्यानुसार त्याला आजपासून पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.