Chinchwad : राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची 23 सुवर्णसह 56 पदकांची कमाई

एमपीसी न्यूज – 34 वी राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा नाशिक येथे नुकतीच (Chinchwad )पार पडली. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलीस आयुक्तालयाच्या संघाने 23 सुवर्ण पदकांसह एकूण 56 पदके मिळवली आहेत. याबद्दल विजेत्या खेळाडूंचे पोलीस आयुक्त विनय  कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी अभिनंदन करून बक्षीस दिले. 
राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस घटकांचे संघ केले(Chinchwad )जातात. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा संघ या स्पर्धेसाठी दाखल झाला होता. राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत पिंपरी-चिंचवड आणि पुणे आयुक्तालयाला 23 सुवर्ण पदके, 13 रौप्य पदके आणि 20 कांस्य पदके अशी एकूण 56 पदके मिळाली आहेत.

महिला पोलीस शिपाई यामिनी उमेशराव ठाकरे या महिला खेळाडूला स्पर्धेची उत्कृष्ट महिला खेळाडू हा सन्मान देण्यात आला. यामिनी ठाकरे या खेळाडूने 5000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात 16 मिनिटे 29 सेकंद वेळ नोंदवून स्पर्धेत वैयक्तिक विक्रमासह सुवर्णपदक मिळवले.

महिला पोलीस शिपाई प्रियंका ज्ञानदेव फलके या खेळाडूने गोळा फेक या क्रीडा प्रकारात 14.45 मीटर गोळा फेकून स्पर्धेत वैयक्तिक विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. 34 वर्षानंतर महिला कबड्डी क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे. पुरुष हँडबॉल संघाने द्वितीय, महिला खो-खो संघाने तृतीय, बॉक्सिंग क्रीडा प्रकारात महिला संघाने चॅम्पियनशिप तसेच पुरुष गटाला तिसरे बक्षीस मिळाले. महिला संघाने जनरल चॅम्पियनशिप मध्ये तिसरा क्रमांक मिळवला.
महिला अॅथलेटिक संघ अॅथलेटिक्स रँकिंग मध्ये दुसरे स्थान मिळाले. तर तायक्वांदो क्रीडा प्रकारात उत्कृष्ट खेळाडू म्हणून पोलीस अंमलदार मयूर कैलास शिंदे यांना सन्मान देण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.