Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमधील ‘डॉग पार्क’मध्ये आता शुल्क आकारणी, एवढे शुल्क                    

एमपीसी न्यूज –  शहरातील अनेक उच्चभ्रू सोसायटीत पाळीव श्वानांची(Pimple Saudagar )संख्या वाढत चालली आहे.  श्वानांना देखील एखादे पार्क असावे म्हणून महापालिकेने पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात पाऊन एकरात सर्व सोयी-सुविधा असलेले डॉग पार्क तयार करण्यात आले आहे.

 

आता त्यासाठी शुल्क आकारणी सुरु केली आहे. सकाळी (Pimple Saudagar )व सायंकाळच्या सत्रात एक व्यक्ती व एका   श्वानासाठी 20 रुपये शुल्क असणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने सध्यस्थितीत बाराशे श्वान परवाने वितरित केलेले आहेत. शहरातील वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, नवी सांगवी, रहाटणी, पिंपळे गुरव, रावेत या भागात श्वान परवाना धारक नागरिकांची सर्वाधिक संख्या आहे.

Medankarwadi: ट्रकची दुचाकीला धडक दुचाकीस्वाराचा मृत्य़ू 

श्वान परवाना घेणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील श्वान प्रेमी नागरिक रस्त्यावर आणि फुटपाथवर श्वानांना फिरवत असतात. त्यामुळे अनेक भागात अस्वच्छता निर्माण होते. त्या श्वानांना स्वतंञ पार्क असावे, तेथे श्वानांना खेळण्यास जागा असावी, अशी मागणी श्वान प्रेमी नागरिक करत होते.

या ‘डॉग पार्क’ मध्ये प्राथमिक टप्प्यात पट्टे नसलेल्या कुत्र्यांसाठी सुरक्षित खेळाची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी स्वतंञ बैठक व्यवस्था तयार केलेली आहे.  तसेच डॉग पार्कमध्ये प्रवेश क्षेत्र – ऑन लीश एरिया आणि तिकीट काउंटरसह, ते लीश प्ले स्पेस ऑफर करणारे दुसरे गेट्स क्षेत्र असणार आहे.  मोठ्या कुत्र्याच्या खेळाच्या जागा लहानांपासून वेगळे करण्यात आले आहेत.

 

आक्रमक स्वभावाच्या कुत्र्यांना देखील विविध प्रकारे खेळण्यास जागा तयार केली आहे. पार्कमध्ये सकाळी व सायंकाळच्या  सत्रात एक व्यक्ती व एका   श्वानासाठी 20 रुपये शुल्क असणार आहे. तर, महिन्याचे शुल्क 500 रुपये आहे.सेलिब्रेशन पॉईन्टचे दोन तासासाठी 1 हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, महापालिकेने गोविंद चौकात हे डॉग पार्क तयार केले आहे. शहरातील श्वान प्रेमी नागरिकांना डॉग पार्कमध्ये  दिलेल्या सोयी सुविधांमुळे निश्चित फायदा होईल. तसेच डॉग पार्क हे पिंपरी-चिंचवडमधील पहिलेच पार्क असल्याने श्वान प्रेमी नागरिकांना त्यांच्या पाळीव प्राण्यासाठी हक्काचे ठिकाण बनत आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.