Pune Crime News : मारहाण करून हत्याराचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुबाडले ; 47 लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज -चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण करून हत्याराचा धाक (Pune Crime News) दाखवत 47 लाखांची रोकड लंपास केली. ही घटना नाना पेठेत काल (ता. 23) सकाळी घडली.

 

 

Today’s Horoscope 24 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

 

याप्रकरणी मंगलपुरी भिकमपुरी गोस्वामी (वय 55, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोस्वामी हे पन्ना एजन्सीमध्ये नोकरीस आहेत. ते नेहमीप्रमाणे दुकानातील व्यवसायाची रक्कम आणि धनादेश बॅंकेत जमा करण्यासाठी जातात.गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते नाना पेठेतील रस्त्यावरून दुचाकीवर जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तोंडाला मास्क लावलेल्या  दोन चोरट्यांनी त्यांना पाठीमागून धक्का देवून अडवले. गोस्वामी यांना मारहाण करून हत्याराने जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील बॅग हिसकावून नेली. या बॅगमध्ये 47 लाख 26  हजारांची रोकड आणि 14 धनादेश होते. या वेळी मारहाणीत फिर्यादी (Pune Crime News) गोस्वामी हे जखमी झाले आहेत.पुढील तपास पोलिस निरीक्षक  प्रमोद वाघमारे करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.