Pune Crime : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला पुणे पोलिसांनी जम्मू-काश्मिरातून केली अटक

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा फायदा घेत तरुणीला पुणे, जम्मू, कटरा अशा वेगवेगळ्या शहरात बोलावून लग्नाच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एका तरुणाला सहकारनगर पोलिसांनी जम्मू-काश्मिर मधून अटक केली.

शहजाद वाणी (वय 30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची नागपूरची आहे. आरोपी तरुणासोबत तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिला जम्मू कटरा पुणे अशा वेगवेगळ्या भागात बोलावून घेत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर तिचे नग्नावस्थेतील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केले आणि लग्न करण्यासही नकार दिला. या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणीने सहकार नगर पोलिस ठाण्यात जुलै महिन्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी तेव्हा गुन्हा दाखल करून घेतला. परंतु covid-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे जम्मू-काश्मिरात जाऊन आरोपीला अटक करून आणणे तेव्हा शक्य झाले नाही. परंतु लॉकडाउन निवळताच सहकार नगर पोलिसांच्या एका पथकाने जम्मू काश्मीर येथे जाऊन कटरा येथून आरोपींना अटक केली. त्याला आज पुणे कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.