Pune : काँग्रेसच्या वार्धपन दिनानिमित्त उद्या सायकल रॅली

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढण्यात येणार आहे. उद्या (रविवार दि.24 रोजी) सकाळी 9.00 वा. देशभक्त केशवराव जेधे पुतळा, स्वारगेट ते काँग्रेस भवन पर्यंत ‘‘सायकल रॅली’’ काढण्यात येणार आहे.

त्यामध्ये माजी नगरसेवक, आजी – माजी पदाधिकारी, नेते मंडळी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने जोरदार केली आहे.

Pune : पुणे शहर 2027 पर्यंत देशातील सर्वाधिक स्वच्छ करण्याचा संकल्प : जगदीश मुळीक

त्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे स्वतः इच्छुक आहेत. या निवडणुकीत पक्ष ब्राह्मण उमेदवार देणार की मराठा याकडे लक्ष लागले आहे.

प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्याही नावाची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिनांक 28 डिसेंबर हा काँगसचा वार्धपन दिन आहे.

त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस इंडिया आघाडी म्हणून लढणार आहे. त्यासाठी काँग्रेसने मोदी सरकार विरोधात सुमारे 28 पक्ष एकत्रित केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.