Pimpri : पिंपरी करंडक ( पर्व 4 थे ) क्रिकेट स्पर्धेतून खेळाचा आनंद घ्या – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे(Pimpri )यांच्या वतीने पिंपरी करंडक ( पर्व 4 थे ) दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक23 डिसेंबर ते30डिसेंबर 2023 दरम्यान नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगण येथे करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी कार्यक्षम नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, उद्योजक संतोष हांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाघेरे, हनुमंत वाघेरे, कुणाल सातव, रवींद्र उर्फ सोनू कदम, अक्षय नाणेकर, संदीप वाघेरे तसेच या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे संदीप नाणेकर, राजेंद्र वाघेरे उपस्थित होते.

यावेळी स्पर्धकांनी बोलताना वाघेरे म्हणाले की, कोणताही खेळ म्हणजे फक्त हरणे-जिंकणे इतकाच मर्यादित नसतो, खेळातून संघभावना, व्यक्तिमत्व विकास आणि खिलाडूवृत्ती यांचा विकास होतो. त्यामुळे फक्त हरणे-जिंकणे या बाबी बाजूला ठेऊन खेळाचा मनमुराद आनंद स्पर्धकांनी घ्यावा.

आयोजित स्पर्धेसाठी कै.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकासाठी 1लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, कै. सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, कै.दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकासाठी 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक तसेच कै.रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी 25हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.

Pune : पुणे शहर 2027 पर्यंत देशातील सर्वाधिक स्वच्छ करण्याचा संकल्प : जगदीश मुळीक

तसेच ४० वर्षांवरील खेळाडूंसाठी ( 40 + ) कै. योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, कै. संतोष नामदेव जाधव यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकासाठी 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, कै. राजेश शंकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकासाठी १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व चषक तसेच कै.सचिन जाधव व सोमनाथ रहाणे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकासाठी 10 हजार रुपये रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर उत्कृष्ठ खेळ होण्यासाठी अत्याधुनिक लाईट व्यवस्था करण्यात आलेले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाच्या 12 खेळाडूना वाघेरे यांच्या वतीने टी शर्टचे वाटप केले जाणार आहे. अंतिम दिवसीय सामन्यासाठी विशेष आकर्षण डान्सिंग पंच डी..एम.रॉक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी श्री संदीप नाणेकर 9011023776 व श्री राजेंद्र वाघेरे 9922863893 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.