Pune : ट्रकचालकास अडवून 50 हजारांची खंडणी मागणा-या वकिलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकास अडवून 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या वकिलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) रात्री 9 च्या दरम्यान विश्रांतवाडी चौकाजवळील मच्छी मार्केट येथे घडला.

अॅड. मुकेश शहारे (अध्यक्ष, पुणे शहर वाहतूक आघाडी) असे या वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी संजय रवींद्र मोहिते (वय 24, रा इंदापूर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिते हे वाळूची ट्रक घेऊन विश्रांतवाडी चौकाजवळील मच्छी मार्केट येथे आले होते. दरम्यान वकिलाने फिर्यादीला अडवून त्यांच्या वाळूच्या ट्रकबाबत विचारणा करून पोलिसांना बोलावण्याची धमकी देऊन 50 हजारांची खंडणी मागितली. फिर्यादीने तडजोडीअंती अॅड. मुकेश शहारे याना 10 हजार रूपये दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.