Pune Murder: भांडणाच्या रागातून तरुणाचा पोटात चाकू खुपसून खून

एमपीसी न्यूज – पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाचा खून (Pune Murder) करण्यात आला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. 
तुषार जयवंत भोसले (वय 28, रा. दांडेकर पूल, पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विश्रांतवाडी परिसरातील आपल्या मामाकडे तुषार भोसले राहत होता. याच परिसरातील काही मुलांसोबत त्याचे भांडण झाले होते. त्यानंतर बुधवारी रात्री तो पुन्हा विश्रांतवाडी परिसरातील वडार वस्ती भागात आला. (Pune Murder) या ठिकाणी त्याचे पुन्हा एकदा भांडण झाले.

यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीने त्याच्या पोटात चाकू खुपसला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तुषारला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान हा गंभीर प्रकार घडल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यातील संशयित आरोपीला त्यांनी ताब्यात घेतले आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.