Crime News : शादी डॉटकॉमवरील ओळखीतून बलात्कारानंतर लग्नाला नकार, तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यात आले.नंतर मात्र लग्न करण्यास नकार दिल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी शंतनू साळुंखे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात मृत्युमुखी पडलेल्या 32 वर्षीय तरुणीच्या भावाने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, या तरूणीने जीवनसाथी या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यामाध्यमातून शंतनु याच्यासोबत तिची ओळख झाली होती.ओळखीनंतर त्यांच्यात बोलणे सुरू झाले.शंतनु याने तरूणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले व तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.परंतु, त्यानंतर तिला टाळाटाळ करण्यास सुरूवात केली.तिने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला लग्नाबाबत टाळण्यास सुरूवात केली. त्यामुळे तरूणी मानसिक तणावाखाली आली होती. तिने या नैराश्यातूनच विषारी औषध पिले. यात ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना गंभीर जखमी झालेल्या या तरूणीचा 30 ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.