Crime News : ॲम्बुलन्स आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात पुणे – नाशिक महामार्गावर ॲम्बुलन्स आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास राजगुरूनगर शहराजवळ असणाऱ्या शासकीय विश्रामगृहाजवळ हा अपघात घडला.दुचाकी आणि ॲम्बुलन्सची समोरासमोर धडक झाली.

अतिश नंदकिशोर सोमवंशी (वय 22) आणि मयूर अशोक पवळे (वय 22) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अपघातातील ॲम्बुलन्स पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी समोरून आलेली दुचाकी चालकाच्या बाजूने ॲम्ब्युलन्सला येऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दुचाकी काही फूट अंतर घसरत केली.दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ॲम्बुलन्स चालक महेश वालकोळी यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.