Pune : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा आज स्नेहमेळावा

एमपीसी न्यूज – व्यक्ती आणि अभिव्यक्तीचा अनोखा मिलाफ असणाऱ्या(Pune ) मुक्तछंद या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती डीईएसचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे यांनी दिली.

या वर्षीचा मुक्तछंद 29 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे. सोमवारी 29 जानेवारी (Pune )सकाळी 10 वाजता पद्मजा फेणाणी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

दुपारी 12 वाजता चित्रपटाचे अंतरंग या परिसंवादात हृषिकेश जोशी, सुनील सुकथनकर, अश्विनी गिरी सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता यमनरंग हा लता मंगेशकर स्वर रजनीचा कार्यक्रम सानिया पाटणकर सादर करणार आहेत.

मंगळवारी 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कालातीत शिवकौशल्ये हा अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले असून, दुपारी साडेचार वाजता शब्द सुरांची रसाळ पोथी हा श्रीधर फडके आणि आनंद माडगूळकर यांची मुलाखत होणार आहे. संध्याकाळी सात वाजता कवितेच्या वाटेवर हा वैभव जोशी हा कार्यक्रम होणार आहे.

बुधवारी 31 जानेवारी सकाळी साडेदहा वाजता नाते कलेशी या कार्यक्रमात शुभांगी गोखले आणि सखी गोखले सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता चर्चा तर होणारच गप्पागोष्टी चा कार्यक्रम आहे उर्मिला निंबाळकर इंद्रजीत मोरे सहभागी होणार आहेत.

 

संध्याकाळी साडेपाच वाजता वारसा लोक कलेचा लावण्यवती ही सुरेखा पुणेकर यांची मुलाखत होणारा असून सायंकाळी सात वाजता स्टॅंडर्ड कॉमेडी नाईट चे सादरीकरण सावनी वझे आणि सिद्धांत बेलवलकर करणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.