Maval : साहित्य उत्कर्ष मंडळ आयोजित ज्येष्ठ नागरिक निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज – साहित्य उत्कर्ष मंडळ मावळ तालुक्याच्या वतीने, (Maval ) लोणावळा येथील ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांकरिता निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा बक्षीस समारंभ, लोणावळा येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे संपन्न झाला.

यावेळी अध्यक्षस्थानी साहित्य उत्कर्ष मंडळा मावळ तालुका अध्यक्ष प्रा.जयंत जोर्वेकर उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून सा.बुलंद मावळचे सहसंपादक, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, यावेळी ज्येष्ठ नागरिक व लोणावळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आज कृष्णाची आवश्यकता आहे, वानप्रस्थाश्रम काळाची गरज, (Maval )स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव , व महाराष्ट्राचे वाल्मिकी ग दि मा. याविषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक शैलजा खिरे, द्वितीय क्रमांक ज्योती रांगणे, तृतीय क्रमांक, (विभागून) मंगला राणे, व सुनीता गावडसे, उत्तेजनार्थ रश्मी शिरस्कर विजया यादव यांनी बक्षीस पटकावले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे यांनी स्वागत केले, साहित्य उत्कर्ष मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मुळे ज्येष्ट नागरिक संघाचे गोरख चौधरी व सहकारी यांनी संयोजन केले. आभार सह सचिव भास्कर पुंडले यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रशांत पुराणिक यांनी केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.