Pune fire brigade : पुण्याच्या अग्निशमन प्रमुखपदी देवेंद्र पोटफोडे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए ) मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांची महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी या रिक्त पदावर अतिरिक्त कारभार देऊन नियुक्ती केली आहे. ते पीएमआरडीए अग्निशमन विभागाबरोबरच महापालिका (Pune fire brigade) अग्निशमन दलाचा कार्यभार पाहणार आहेत. यावेळी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून व फटाके फोडून त्यांचे स्वागत केले.

पोटफोडे हे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून सुवर्णपदक विजेते असून मागील 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्यांनी अग्निशमन विभागाच्या सेवेत आहे. बांधकाम नियंत्रण नियमावली आणि एनबीसीच्या तरतुदींनुसार विविध प्रस्तावित नागरी तसेच औद्योगिक प्रकल्प आणि मोठ्या प्रकल्पांना अग्निशमन मंजुरी देण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून कोविड काळात संपूर्ण राज्यात सर्वात सक्षम व प्रभावीपणे पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट समन्वयाचे काम त्यांनी पार पाडले आहे.

Pimpri Chinchwad Police : तरुणांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा अनोखा उपक्रम

राज्य सरकारच्या अनेक अग्निशमन विषयक समित्यांवरही तांत्रिक तज्ज्ञ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रिया, दुबई आदी देशातील विकसित अग्निशमन सेवांना भेटी दिल्या आहेत. (Pune fire brigade) तर 2011 आणि 2021 असे दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळविण्याचा बहुमान प्राप्त असून त्यांनी राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदक व विशिष्ट अग्निशमन सेवा पदक पटकाविले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.