Pune : पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार;हल्ल्यात एक तरुण जखमी

एमपीसी न्यूज : -पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार  करण्यात आला आहे. (Pune) या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे.हा सगळा प्रकार पुण्यातील बाणेर भागात असलेल्या महाबळेश्वर हॉटेल जवळ घडला.पोलिसांना घटनास्थळावरून गावठी कट्ट्याचा 1 जिवंत राऊंड आणि 2 केसेस जप्त केल्या आहेत.

या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आदित्य रणावरे आणि सागर बनसोडे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. निलेश पिंपळकर यांनी  फिर्याद दिली आहे.

Hingoli Earthquake : हिंगोलीत भूकंपाचे धक्के; सुदैवाने जीवितहानी नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश आणि रोहीत हे दोघे ही एकाच भागात राहायला असून एका मोटार कंपनीमध्ये ते काम करतात. रोहित याला कंपनी मधून कामावरुन काढुन टाकले या गैरसमजुतीतून रोहित ने फिर्यादी याला महाबळेश्वर हॉटेल समोरील 45 अव्हेन्युव बिल्डींग जवळ बाणेर कडे जाणाऱ्या रोड लगत भेटण्यास बोलावून घेतले.

फिर्यादी हे त्यांचे मित्र आकाश बाणेकार आणि रोहित यांच्याशी बोलत असताना त्या ठिकाणी आरोपी अदित्य दिपक रणावरे, सागर लक्ष्मण बनसोडे यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन बंदुकीतून गोळीबार केला.

हे आरोपी रोहितचे मित्र होते.या हल्ल्यात फिर्यादी यांचा मित्र आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागुन तो गंभीर जखमी झाला.पोलिसांकडून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share